Shrikhand Recipe : श्रीखंडाचे दर वाढलेत? चिंता नको! घरच्या घरी बनवा चविष्ट श्रीखंड; सोपी आणि झटपट रेसिपी जाणून घ्या

गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात.
Shrikhand Recipe : श्रीखंडाचे दर वाढलेत? चिंता नको! घरच्या घरी बनवा चविष्ट श्रीखंड; सोपी आणि झटपट रेसिपी जाणून घ्या

Shrikhand Recipe : गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. हा सण सर्वांसाठीच खूप आनंदाचा आणि चैतन्याचा असतो.या दिवशी सणाच्या जेवणाला विशेष महत्व असतं. महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी मुख्यत्वे बनवली जाते. त्याचबरोबर श्रीखंड आणि पुरी-भाजीचा नैवेद्यही असतो. बहुतांश कुटुंबांमध्ये श्रीखंड-पुरीचा बेत हमखास असतो. थंडगार, गोड आणि सुगंधी श्रीखंडासोबत गरमागरम पुरी हा मेनू अनेकांच्या आवडीचा आहे. पण तुम्हाला श्रीखंड सोप्या आणि झटपट पद्धतीने कसं बनवायचे हे माहितीये का? चला तर मग ते पाहूया… 

साहित्य:

दही (घट्ट) – 500 ग्रॅम
पिठीसाखर – 150-200 ग्रॅम (चवीनुसार)
वेलची पूड – ½ टीस्पून
केशर – 8-10 काड्या (थोड्या कोमट दुधात भिजवलेले)
जायफळ पूड – चिमूटभर (ऐच्छिक)
बदाम- पिस्त्याचे काप – सजावटीसाठी 

 कृती :

1.दही लटकवा

 दही स्वच्छ कापडात बांधून 5–6 तास (किंवा रात्रभर) लटकवून ठेवा. यामुळे त्यातले पाणी निघून जाऊन आणि घट्ट चक्का तयार होईल. 

2. चक्का तयार करा

तयार झालेला चक्का एका भांड्यात घ्या.चमच्याने किंवा हँड व्हिस्कने गुळगुळीत होईपर्यंत फेटा. 

3. साखर मिसळणे

चक्क्यात चवीनुसार पिठीसाखर घालून चांगले एकजीव करा.

4. टेक्स्चर तपासा

श्रीखंड खूप घट्ट वाटल्यास 1–2 चमचे दूध घालून मिक्स करा. 

5. फ्लेवर्स घाला

वेलची पूड, केशर दूध आणि जायफळ पूड घालून चांगले एकजीव करा.

6. थंड करा

तयार केलेले श्रीखंड 1-2 तास फ्रिजमध्ये ठेवा, जेणेकरून ते छान सेट होईल. 

7. सजावट आणि सर्व्हिंग

श्रीखंड एका बाऊलमध्ये काढून घ्या, त्या वर बदाम-पिस्त्याचे काप घालून थंडगार श्रीखंड सर्व्ह करा. 

 टिप्स:

– दही लावताना पूर्ण मलईचे दूध वापरल्यास चक्का अधिक चविष्ट होतो. 
– आंबट दही वापरणे टाळा, नाहीतर चव बिघडू शकते.
– मँगो फ्लेवरसाठी आंब्याचा रस घालून आम्रखंड तयार करू शकता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version