मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने विविध उद्योग समुहांच्या एक लाख वीस हजार २२० कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली. समितीने तीन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे राज्यात हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे.
*Skoda Volkswagen — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 5, 2024
देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात
देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. मागील दोन वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात २०२४ – २५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७० हजार ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.
महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ या काळात तीन लाख ६२ हजार १६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती. आता सव्वा दोन वर्षांत राज्यात तीन लाख १४ हजार ३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारने आणली आहे.
अभिनंदन महाराष्ट्र !
अतिशय आनंदाची बातमी !!
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के
परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!! गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा… pic.twitter.com/8XT2n7e0w2 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 6, 2024
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.