राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत भर सुरूच असून बुधवारी ६ हजार ८५७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत,तर ६ हजार १०५ रूग्ण बुधवारी बरे होऊन घरी परतले आहेत.तसेच बुधवारी राज्यात २८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ६४ हजार ८५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या ८२ हजार ५४५ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईमध्ये बुधवारी ४०४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३८२ जण कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पटीचा वेग १ हजार ३८३ दिवसांवर पोहोचला आहे.
#CoronavirusUpdates
२८ जुलै, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण – ४०४ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ३८२
बरे झालेले एकूण रुग्ण – ७११६९७
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७% एकूण सक्रिय रुग्ण- ५२८० दुप्पटीचा दर- १३८३ दिवस
कोविड वाढीचा दर (२१ जुलै ते २७ जुलै)- ०.०५% #NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 28, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.