राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा वाढला

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा वाढला

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना दोन दिवसानंतर कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राज्यात दिवसभरात १० हजार ६६ कोरोनाबाधित आढळून आले. सोमवारी हा आकडा ६ हजारांवर होता. मंगळवारी दिवसभरात १६३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ११ हजार ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरियंट ही राज्यासाठी चिंतेची बाब असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. डेल्टा प्लसचे सात जिल्ह्यात २१ रुग्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचेही टोपे यांनी सांगितले. या रुग्णांसाठी वेगळे वॉर्ड तयार करण्यात येत असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. संगमेश्वरमधील चार गावांमध्ये जास्त धोका असल्याने तेथे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version