जगभरातील प्रेमिकांना मावळच्या गुलाबांची भुरळ

जगभरातील प्रेमिकांना मावळच्या गुलाबांची भुरळ

जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाइन डे आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही फुले पुरवण्यासाठी मावळात इंद्रायणी भाताच्या आगारातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे. या वर्षी व्हॅलेंटाइन डेला तालुक्यातून दहा लाख फुलांची निर्यात होणार आहे.

या वर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला सव्वीस जानेवारीला सुरुवात झाली. या वर्षी पोषक वातावरण असल्याने फुलांच्या उत्पादनवाढी बरोबर दर्जाही उत्तम आहे. औषधांवर नाहक होणारा खर्च पोषक वातावरणामुळे कमी झाला असून, उत्पादन, दर्जा चांगला असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. फुलांची प्रतवारी देठाच्या लांबीनुसार ठरवली जाते. स्थानिक व जागतिक बाजार पेठेत ४० ते ६० सेंटीमीटर लांबीच्या फुलांना मोठी पसंती असते. या वर्षी मावळातील फुलांना प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत एका फुलाला २० ते २२ रुपये, तर स्थानिक बाजारपेठेत १५ रुपये भाव मिळत आहे.

मात्र यावर्षी विमान खर्च आणि जीएसटी चा जादा खर्च पडल्याने यावर्षी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना भुर्दंड पडला आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या फुलांचा खर्च जास्त असल्याने यावर्षी अनेक देशात फुल निर्यात झाले नसल्याने हा फटका देखील शेतकऱ्यांना बसला असल्याचे दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version