साताऱ्यातील नीरा नदीतील लाखो माशांचा मृत्यू

साताऱ्यातील नीरा नदीतील लाखो माशांचा मृत्यू

रसायन मिश्रित आणि मळी मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता ओढ्याद्वारे नदीत सोडले जात असल्याने नदीतील पाण्याला हिरवा रंग येऊ लागला असून पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. तसेच मासेही मोठ्या प्रमाणात मृ्त्युमुखी पडत आहेत. याशिवाय नदीच्या खराब पाण्यामुळे नदी काठच्या जमिनीवर क्षाराचे थर येऊन ती नापीक होत आहे. पिकांची वाढ खुंटत आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत चालला आहे.

नीरा नदी परिसरातील काही युवक तीन दिवसांपासून हे मृत मासे पकडून टेम्पोत भरून भिगवण या ठिकाणी विक्रीस पाठवत आहेत. रासायनिक पाण्यामुळे मृत्यू झालेल्या मासे खाल्ल्याने जर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात दूषित पाणी निरा नदीत सोडल्या बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित कारखान्यावर कारवाई करणार का? असा सवाल होळ येथील ग्रामस्थ विचारत असून या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसुद्धा असह्य झाले असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version