नव्या नवेलीसोबत असलेल्या मुलाच्या नात्यावर ; जावेद जाफरी यांचा खुलासा

नव्या नवेलीसोबत असलेल्या मुलाच्या नात्यावर ; जावेद जाफरी यांचा खुलासा

मुंबई: अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांच्या अफेअरची चर्चा मागच्या काही काळापासून फार सुरू असल्यानं जावेद जाफरी यांनी याबद्दल खुलासा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जावेद जाफरी यांनीही नव्यासोबत आपल्या मुलाच्या नात्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘नव्या आणि मीजान यांच्या अफेअर बद्दलच्या चर्चा या फक्त अफवा आहेत. एखाद्या व्यक्तीचा चांगला मित्र असण्याला लोकं काही वेगळंच समजून बसत आहे. त्या दोघांचं एकच फ्रेंड सर्कल एक आहे. लोकांना फक्त चर्चेचा विषय हवा असतो. माझा मुलगा आणि नव्या शाळेत असताना पासून एकमेकांना ओळखतात. ते दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

जावेद जाफरी पुढे सांगितलं, ‘नव्या आणि मीजान यांच्या मित्रमैत्रीणींचा एक कॉमन ग्रुप आहे. ज्यात सारा अली खान सुद्धा आहे. सारा आणि मीजान एकाच क्लासमध्ये होते. त्यामुळे ते घरी सुद्धा येतात. पहाटे ३ वाजेपर्यंत सर्वजण गप्पा मारत बसतात. ते नेहमीच एकत्र असतात. त्यामुळे त्यांच्या लिंकअपच्या चर्चा होणं सहाजिक आहे. पण ते केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहेत.’ असं जावेद जाफरी यांनी सांगितलं आहे. नव्या आणि मीजान फक्त एकमेकांसोबत फिरताना दिसतात शिवाय सोशल मीडियावरही दोघं एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. जेव्हा ‘तू नव्याला डेट करत आहेस का?’ असा प्रश्न मीजानला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यानं त्या दोघांमध्ये मैत्री व्यतिरिक्त आणखी कुठलंच नातं नसल्याचं म्हटलं होतं. नव्यानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. ज्यावर कमेंट करत मीजाननं तिला, ‘हा फोटो कोणी क्लिक केला?’ असं विचारलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version