‘बास झालं, आता राजकीय कलगीतुरा पुरे करा’

‘बास झालं, आता राजकीय कलगीतुरा पुरे करा’

  ‘बास झालं, आता राजकीय कलगीतुरा पुरे करा!’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया आता समाजातील मान्यवर व्यक्त करत आहेत. राजकीय कलगीतुऱ्याबाबत मान्यवरांची उघड नाराजी व्यक्त होत आहे. लोकांना राजकीय कलगीतुरा न आवडणारा आहे अशी प्रतिक्रिया कवी रामदास फुटाणे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांविरोधात केलेल्या ट्विटमध्ये ‘फार पूर्वी मी शिकलो होतो, डुकराशी कधीही कुस्ती खेळू नका. त्यामुळे आपल्या अंगावर घाण उडते, याउलट डुकराला मजा येते’, असे म्हटले होते. यावर फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या चिखल कवितेतील ओळी शेअर करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

 ‘चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला, बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला’. या कवी आणि वात्राटिकाकार रामदास फुटाणेंच्या कवितेच्या ओळी ट्विट करुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या डुकराच्या ट्विटवर भाष्य केले आहे.

 दरम्यान, आपल्या चारोळीवर वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी संवाद साधताना म्हटलं की, राजकीय कलगीतुऱ्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या फारच अंधारलं आहे. अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती आणि ही स्थिती लोकांना अजीबात आवडत नाहीये. रामदास फुटाणे जय महाराष्ट्र वृत्तविहीनीशी बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version