‘इंधनाऐवजी दारुचा कर कमी करणे राज्याचे दुर्भाग्य’ – रवी राणा

‘इंधनाऐवजी दारुचा कर कमी करणे राज्याचे दुर्भाग्य’ – रवी राणा

  पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सततच्या वाढीमुळे सामान्यांच्या खिशाला जास्तीची कात्री लागत होती. दरम्यान आता केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स अद्याप कमी केलेले नाही. त्यामुळे आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

  ‘केंद्राने इंधनाचे दर कमी केले मात्र राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी न करता दारू वरील टॅक्स कमी करत दारू स्वस्त केली आहे. हे राज्याचे दुर्भाग्य आहे’, अशी टीका बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.

मविआ हे ‘मद्य विकास आघाडी’ सरकार

  महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे मद्य विकास आघाडी सरकार असल्याची टीका भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केली आहे. ‘ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठीच निर्णय घेतले जात आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे हाल, एसटी कर्मचारी संपावर, पेट्रोल-डिझेलला कोणताही सवलत नाही पण दारूला मात्र विशेष सवलत सातत्याने दिली जात आहे’, त्यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार नाही तर मद्य विकास आघाडीचे सरकार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे तुषार भोसले म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version