डहाणू तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

डहाणू तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

डहाणू ब्लॉकमधील निवडक गावांत डीटीपीएसने नाबार्डसोबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सुरू केला आहे. आदिवासींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला असून, या उपक्रमाअंतर्गत गेल्या ७ वर्षांत स्वत:ची जमीन असलेल्या १००० आदिवासी कुटुंबांनी १ एकरांची वाडी विकसित केली आहे. तर या उपक्रमातून १०० भूमिहीन आदिवासी कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे.

आदिवासींना गरीबीमुक्त करण्यासाठी शाश्वत आणि जगभर लागू करता येईल असे वाडी विकास मॉडेल या भागात वापरून या आदिवासींना चरितार्थाचे साधन उपलब्ध करून देणे ही या प्रकल्पाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या उपक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे लहान वाडी. जमिनीचे संवर्धन, पाण्याच्या स्रोताचा विकास आणि इतर उपायांनी या वाडीचा विकास करून आरोग्य व स्वच्छतेच्या सोयी, महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, संस्थात्मक विकास यांसारख्या गोष्टींच्या माध्यमातून आदिवासींचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेल्या डहाणू ब्लॉकमध्ये आदिवासी विकास उपक्रमाअंतर्गत नैसर्गिक स्रोतांच्या व्यवस्थापनासाठी कार्यक्रम राबवला गेला, डीटीपीएसच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एमआयटीटीआरए व नाबार्ड या संस्था सहकार्य केला.
भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या (बीएआयएफ) सहाय्याने चाललेली महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर फॉर रूरल एरियाज (एमआयटीटीआरए) संस्था या उपक्रमाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.

प्रकल्प संचालक राजेंद्र नंदी यांच्या हस्ते बोंडगावात प्रकल्पाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत महिला मेळावा (महिलांचे एकत्रीकरण) व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जामशेत गावात महिला मेळावा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २६४ महिला सहभागी झाल्या होत्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version