भारतीय विद्यार्थी युक्रेन सैन्यात सामील

भारतीय विद्यार्थी युक्रेन सैन्यात सामील

भारतातील तामिळनाडूमधील एक विद्यार्थी रशियाविरोधाती युद्धात लष्करी सैन्यात सामील झाला आहे. साई निकेश रविचंद्रन असे या विद्यार्थ्याचे नाव असून हा विद्यार्थी युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाला आहे.

कोईम्बतूर जिल्ह्यातील साई निकेश रविचंद्रन या विद्यार्थ्याने भारतीय सैन्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश आले नही. भारतीय सैन्यात साईला प्रवेश न मिळाल्यामुले त्याच्या कुटुंबाने साईला खारकीव येथील एरोस्पेस अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. साई निकेश रविचंद्रन युक्रेन सैन्यात सामिल झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चौकशी केली.

युक्रेनच्या लष्करात २० हजार परदेशी दाखल

युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून युक्रेनवरील आक्रमणाचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. मोठ्या संख्येने परदेशी नागरिक युक्रेनला पठिंबा देत असून हे युक्रेनच्या सैनिकांसोबत रशियन सैन्याशी लढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतासह अनेक देशांतील नागरिक रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनच्या स्वयंसेवी लष्करी दलात सामील झाले आहेत. युक्रेनमधील द किव्ह इंडिपेंडंट या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राच्या दाव्यानुसार रशियाच्या चालू आक्रमणाविरुद्ध युक्रेनियन सशस्त्र दलात २० हजार परदेशी लोक लढत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version