इम्रान खान सरकार कोसळलं

इम्रान खान सरकार कोसळलं

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर शनिवारी रात्री अविश्वास प्रस्ताव संमत झाला आहे. पाकिस्तानच्या संसदेत एकूण ३४२ खासदारांपैकी इम्रान खान यांना बहुमतासाठी १७२ मतांची गरज होती. मात्र अविश्वास प्रस्तावामध्ये इम्रान यांच्या विरोधात १७४ मतं पडली. दरम्यान पाकिस्तानी संसदेत इम्रान यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव संमत झाला. यामुळे इम्रान खान यांना आता पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षनेते शहाबाज शरीफ हे पदभार सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव संमत झाल्याने आता पाकिस्तानात सत्तांतर होणार आहे. पाकिस्तानच्या संसदेतील विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ हे आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. शहाबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाचे अध्यक्ष आहेत.

कोण आहेत शहाबाज शरीफ ?
शहाबाज शरीफ हे सध्याचे पाकिस्तान संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाचे ते अध्यक्ष असून नवाज शरीफ यांचे ते लहान भाऊ आहेत. ते तीन वेळा पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले असून २०१८ साली पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी ते उभे राहिले होते. १९८८ सालापासून शहाबाज पाकिस्तानी राजकारणात सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांच्यावर पैशांच्या अफ़रातफरीचेही आरोप आहेत.
पाकिस्तानात कोणतेही सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करत नाही असा इतिहास असताना आता अविश्वास ठराव हारून इम्रान खान हे सुद्धा आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पंतप्रधान पदावरून पायउतार होणार आहेत. पाकिस्तानातील नवे सत्तांतर झालेले नेतृत्व कसे असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version