राज्यात भोंग्याच्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, भाजपने बहिष्कार टाकत या बैठकिला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
भोंग्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र, या भोंगा बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाही. त्यामुळे भोंगा बैठकीला मुख्यमंत्री का नाहीएत? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मविआचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बोलावलेल्या भोंगा सर्वपक्षीय बैठकीला भाजपने आक्षेप घेतला आहे. या बैठकीत भाजपचा कोणीही प्रतिनिधी सहभागी झाला नसून बिनाधिकारी गृहमंत्र्यांच्या बैठकीला का जायचे? असाही सवाल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. त्यामुळे आता मविआसोबत संवाद अशक्य असून संघर्षच करावा, असे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे.
राज्यात जर कुणी हिटलर प्रवृत्तीने वागत असेल तर त्यांच्यासोबत संवादापेक्षा संघर्ष केलेला चांगला. त्यामुळे आज भाजपने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना जीवे मारण्यासाठी पोलिसांसमोर हल्ले होणार असून एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकीत न गलेले चांगलेच, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.