भाजप नेते निलेश राणे वेळोवेळी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीकाटिप्पणी करताना दिसतात. आज त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. टाईमपास होत नसेल तर बिगबॉस मध्ये जाण्याचा सल्ला निलेश राणे यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना दिला आहे.
निलेश राणे म्हणाले, ‘महाविकास आघाडीमधील सर्वच नेते काम नसल्यासारखे शायरी करत असतात. गुहागरचे नेते मिमिक्री करतात. तर मंत्री कव्वाली गातात. कोणी डान्सर नाचवतात. त्यामुळे या नेत्यांचा टाईमपास होत नसेल तर राज्य सरकारमधील नेत्यांनी बिगबॉसमध्ये जावे, त्यांनी घेतलं तर. कारण या नेत्यांची त्या घरात जाण्याची लायकी नसल्याचे’ निलेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान जळगावमधील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायली होती. त्यामुळे नीलेश राणे यांनी त्यांच्याविरोधात ट्विट करत बदनामकारक पोस्ट केली होती. त्यामुळे नीलेश राणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलिसांत नीलेश राणेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.