Kairi Panha Recipe: आंबट-गोड कैरी पन्हे; उन्हाळ्यासाठी परफेक्ट पेय

कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यात पिण्यासाठी अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक मराठी पेय आहे. उष्णतेमुळे होणारा थकवा आणि शरीरातील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी पन्हे खूप उपयोगी ठरते. योग्य पद्धतीने तयार केलेले पन
Kairi Panha Recipe: आंबट-गोड कैरी पन्हे; उन्हाळ्यासाठी परफेक्ट पेय

Kairi Panha Recipe: कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यात पिण्यासाठी अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक मराठी पेय आहे. उष्णतेमुळे होणारा थकवा आणि शरीरातील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी पन्हे खूप उपयोगी ठरते. अनेक घरांमध्ये उन्हाळा सुरू होताच कैरीचे पन्हे बनवले जाते. हे पेय केवळ चविष्टच नाही तर शरीराला थंडावा देणासाठी ही फायदेशीर आहे. योग्य पद्धतीने तयार केलेले पन्हे काही दिवस साठवून ठेवता येते आणि गरजेप्रमाणे पाण्यात मिसळून पटकन सर्व्ह करता येते.

साहित्य:

  • 2 कच्च्या कैऱ्या
  • 1 कप गूळ किंवा साखर (आवडीनुसार)
  • 1 चमचा जिरे पूड
  • 1/2 चमचा काळं मीठ
  • 1/4 चमचा वेलची पूड
  • पुदिन्याची पाने
  • थंड पाणी   

हेही वाचा: Kaju chi Bhaji : घरच्याघरी मालवणी स्टाईल बनवा ओल्या काजूगराची भाजी, जाणून घ्या रेसिपी

कृती:

  • कैऱ्या शिजवणे:

सुरुवातीला कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यांना कुकरमध्ये 2–3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा किंवा पाण्यात उकळून मऊ करा. थंड झाल्यावर त्यांची साल काढून गर वेगळा करून घ्या.

  • मिश्रण तयार करणे:

मिक्सरमध्ये कैरीचा गर, गूळ किंवा साखर, काळं मीठ, जिरेपूड आणि पुदिन्याची पाने घाला. हे सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार होईपर्यंत बारीक वाटून घ्या.

  • साठवणूक:

तयार झालेले पन्ह्याचे मिश्रण काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. हे मिश्रण साधारण 1–2 महिने टिकू शकते.

  • सर्व्ह करण्याची पद्धत:

एक ग्लास घ्या आणि त्यात या मिश्रणाचे 3–4 चमचे घाला. त्यानंतर त्यात थंड पाणी आणि बर्फाचे खडे घालून चांगले हलवा. अशा प्रकारे थंडगार कैरीचे पन्हे पिण्यास तयार होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version