‘हिंदुस्थानी भाऊ’चे आवाहन, आंदोलन भडकले

‘हिंदुस्थानी भाऊ’चे आवाहन, आंदोलन भडकले

हिंदुस्थानी भाऊ नावाच्या अधिकृत अकाऊंटवरून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर आंदोलक विद्यार्थी भडकले असून विद्यार्थी राज्यभरात ऑफलाईन परिक्षांच्याविरोधात रस्त्यावर आले. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी आक्रमक झाले, तर हा हिंदुस्थानी भाऊ कोण आहे?

हिंदुस्थानी भाऊ यांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले. परीक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे ऑफलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांबाबत खेळ का करतात? असा सवाल हिंदुस्थान भाऊ उर्फ विकास फाटक यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. शिक्षक ऑनलाईन बैठक घेत आहेत. शिक्षकांना त्यांच्या जीवाची काळजी आहे. तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊ यांनी व्हिडिओमधून प्रसिद्ध केला आहे.

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?

हिंदुस्थानी भाऊ यांचे खरे नाव विकास फाटक असे आहे. मात्र, समाज माध्यमांवर हिंदुस्थानी भाऊ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. विकास फाटक हे प्रसिद्ध युट्युबर आहेत. युट्युबरवर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम बीग बॉसच्या १३व्या पर्व्यामध्ये हिंदुस्थानी भाऊ स्पर्धक होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version