हार्दिक पटेल भाजपात

हार्दिक पटेल भाजपात

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम करणारे गुजरातचे नेते हार्दिक पटेल आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या २ जून रोजी हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुजरात भाजपाला नवे बळ मिळणार आहे.

काँग्रेसमधील नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. हार्दिक पटेल यांनी राजीनाम्या दिल्यापासूनच त्यांचा भाजपात प्रवेश होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. हार्दिक पटेल यांनी स्वत: २ जून रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, यावर्षाच्या अखेरीस गुजरातच्या विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. अशातच, हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभा निवडणूक काँग्रेसला महागात पडणार आहे. तसेच हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाची स्तुती करत काँग्रेस नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता हार्दिक पटेल यांनी भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. हार्दिक पटेल २ जून रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version