गुढीपाडवा म्हणजे समृद्ध आणि परंपरेचे प्रतीक

गुढीपाडवा म्हणजे समृद्ध आणि परंपरेचे प्रतीक

चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होताता. शिवाय रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असं मानल्या जातं. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे. त्यानंतर तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे हे एक लक्षण असून विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढीला उभी करतो.

गुढीपाढव्याबद्दल एका दंतकथेनुसार चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या करतात आणि घरांच्या दारांना आंब्याच्या पानाचे तोरण लावतात. फुलांच्या माळांनी घर सजवितात. या दिवसाला विशेष महत्व असून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाने साजरा करतात. आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा! प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशो‍भित होऊन गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस म्हणून या दिवसाला ओळखतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version