राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन आणि तुमची समाज माध्यमांवर बदनामी करेन, अशी धमकीही या महिलेने धनजंय मुंडे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
धनंजय मुंडे यांनी तक्रार केली की, आरोपी महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. ती तक्रार त्यांनी मागे घेतली होती, पण त्यानंतरही त्या महिलेने यावर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दूरध्वनी करून पाच कोटी रुपये किमतीचे दुकान, महागड्या मोबाईलची मागणी केली होती. तसे न केल्यास समाज माध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.