जागतिक महिला दिनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले आहे. मंगळवारपासून मुंबई पोलीस दलातील महिलांना आठ तासांची ड्युटी असेल. घर आणि कर्तव्य यामध्ये समतोल साधता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहेत. महिला दिनापासून पुढील आदेशापर्यंत महानगरात हे निर्देश लागू असतील, असे अधिकार्यांनी सोमवारी सांगितले.
याआधी राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम पाहणारे संजय पांडे यांनी या वर्षी जानेवारीत आठ तासांच्या ड्युटी शेड्यूलची सुरुवात केली होती. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, महिला कर्मचार्यांसाठी दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायात, त्यांना सकाळी ८ ते ३, दुपारी ३ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशा तीन शिफ्टमध्ये काम करावे लागेल. दुसऱ्या पर्यायामध्ये सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा शिफ्टच्या वेळा आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी महिला दिनानिमित्त आपल्या शाळेच्या फळ्यावर खडूच्या साहाय्याने पहिल्या सुशिक्षित महिला ट्रकचालकाचे चित्र रेखाटले आहे. महिला विविध क्षेत्रात कर्तृत्वाची मोहर उमटवताना दिसतात. योगिता रघुवंशी देशातील पहिल्या महिला ट्रक चालक भोपाळ येथील आहेत. त्या कॉमर्स पदवीधर असून कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबातील दोन मुलांची जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी ट्रक चालवण्यास सुरुवात केली. देशाच्या कानाकोपऱ्यात दिवस-रात्र भ्रमण करणाऱ्या या रणरागिणीचा आदर आणि सन्मान व्हावा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त रंगीत खडूंच्या सहाय्याने तिचे चित्र रेखाटत तिच्या धैर्याला आणि कर्तृत्वाला सलाम केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.