‘अभिजात भाषेचा दर्जा द्यायची तुमची लायकी आहे का?’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘अभिजात भाषेचा दर्जा द्यायची तुमची लायकी आहे का?’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक सोहळ्यात भाजपवर निशाणा साधला असून मोदी सरकारची लायकी काढली आहे. भाजपने हिंदुत्वाचा वापर सत्तेसाठी केला असून अभिजात भाषेचा दर्जा द्यायची तुमची लायकी आहे का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी बोलताना, महाराष्ट्रात कुणालाही स्वबळावर सत्ता अशक्य असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारची लायकी काढली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायची तुमची लायकी आहे का? असा प्रश्न विचारून त्यांनी नवा वाद जन्माला घातलाय.

मविआमधील नेत्यांवर होणाऱ्या कारवायांवर भाष्य करताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर सवाल उपस्थित केला आहे. केंद्रीय यंत्रणांना इतर राज्यात काही दिसत नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर भाजपचा घणाघात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राची लायकी काढल्यावर भाजपनेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘हे मुख्यमंत्री की, कुठल्या टोळीचे प्रमुख? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री कायमच पक्षप्रमुखाच्या भूमिकेत असून मुख्यमंत्री म्हणून भाषेची मर्यादा का नाही? असा सवालही भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version