Dark Circles Remedies: डार्क सर्कलमुळे होतोयं सौंदर्यावर परिणाम?; हा घरगुती उपाय केल्यानं डोळे दिसतील सुंदर

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे तुमचं सौंदर्य बिघडलेलं पाहाायला मिळतं. डार्क सर्कल कमी होत नसल्याने तुम्हाला आणखी टेंशन येतं. यावर घरगुती उपाय जाणून घेऊयात...  
Dark Circles Remedies:  डार्क सर्कलमुळे होतोयं सौंदर्यावर परिणाम?; हा घरगुती उपाय केल्यानं डोळे दिसतील सुंदर

Dark Circles Remedies: डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे तुमचं सौंदर्य बिघडलेलं पाहाायला मिळतं. डार्क सर्कल कमी होत नसल्याने तुम्हाला आणखी टेंशन येतं. अपुरी झोप, ताणतणाव, अयोग्य लाइफस्टाइल यासह अन्य कारणांमुळे चेहऱ्यावर थकवा जाणवतो आणि अकाली म्हातारपण दिसू लागते. या समस्येवर उपाय करण्यासाठी महिलांसह पुरुष देखील महागड्या क्रिमची मदत घेतात. पण इतका पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. महागड्या क्रिम्स किंवा ब्युटी ट्रीटमेंटऐवजी तुम्ही किचनमधील काही पदार्थांचा वापर करू शकता. योगगुरु कैलाश बिश्नोई यांनी सांगितलेले घरगुती उपाय जाणून घेऊयात…  

डार्क सर्कलची समस्या 
डार्क सर्कलची समस्या अतिशय सामान्य आहे. रात्री उशीरापर्यंत मोबाइलचा वापर करणे, पुरेशा प्रमाणात झोप न घेणे, वाढता ताणतणाव यासारख्या कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ दिसू लागतात. तुम्ही देखील डार्क सर्कलच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर महागड्या क्रिमचा वापर करण्याऐवजी सोपे करा.

डार्क सर्कल समस्येमागील कारणं 
अपुरी झोप, वाढते वय, आनुवंशिक (कुटुंबाशी संबंधित समस्या), अ‍ॅलर्जी आणि डिहायड्रेशन, मोबाइल, लॅपटॉपचा अति वापर करणे, जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात येणे. 

हेही वाचा: Health Tips: सर्व आजारांवर रामबाण उपाय; जाणून घ्या 'या' जादुई बीजाचे गुपित
योगगुरू कैलाश बिश्नोई यांनी सांगितलेला उपाय 
योगगुरू कैलाश बिश्नोई यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये डार्क सर्कलशी संबंधित उपाय सांगितला आहे. डार्क सर्कल कमी करण्यासाठी किचनमधील पदार्थांचा वापर करावा लागेल. 

डार्क सर्कल समस्येवरील उपाय 
सामग्री 

कच्चे दूध, हळद, मध, कॉफी पावडर

डार्क सर्कल कमी करण्यासाठी पेस्ट कशी तयार करावी
एका वाटीमध्ये कच्चे दूध घ्या. त्यामध्ये हळद, मध, कॉफी पावडर मिक्स करुन पेस्ट तयार करा. पेस्ट डोळ्यांखाली लावावी. 10 मिनिटांनंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करावी.  आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता. 

घरगुती उपाय केल्यास कोणते फायदे मिळतील? 
कच्चे दूध : कच्चे दूध त्वचा हायड्रेट राहण्यास मदत करेल आणि त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा मिळेल.  
हळद: हळदमध्ये असणाऱ्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सूज आणि त्वचेचा काळेपणा दूर होईल. 
मध : मध त्वचेला मॉइश्चराइझर करेल आणि त्वचा मऊ होण्यास मदत मिळेल. 
कॉफी पावडर : कॉफी पावडर डोळ्यांच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया वाढवेल आणि यामुळे काळी वर्तुळं कमी होण्यास मदत मिळेल. 

 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version