अमरावती शहरात संचारबंदी कायम; इंटरनेट सेवा बंद

अमरावती शहरात संचारबंदी कायम; इंटरनेट सेवा बंद

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे अमरावतीमधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला असून ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच अमरावतीत इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे.

  मात्र, अमरावती शहरात संचारबंदी कायम असणार असून इंटरनेट सेवासुद्धा बंद राहणार आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी दिली आहे. तसेच अमरावतीमध्ये मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे आतापर्यंत एकूण ३५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १८८ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 अमरावतीमध्ये भाजपच्या बंदला हिंसक वळण लागले. तर बंददरम्यान अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून वार्तांकनादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर दगडफेक करण्यात आली. अमरावतीमध्ये जातीय तणाव चिघळला, असून शिवसेनासुद्धा या बंदमध्ये सहभागी झाली. तसेच आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version