Crispy Potato Slices : आज भाजी काय बनवायची हा प्रश्न पडलायं? तर आजच ट्राय करा ‘ही’ झटपट होणारी रेसिपी

रोजरोज भाजी काय बनवायची, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. आणि रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळादेखील येतो. ही रेसिपी ट्राय करा
Crispy Potato Slices :  आज भाजी काय बनवायची हा प्रश्न पडलायं? तर आजच ट्राय करा ‘ही’ झटपट होणारी रेसिपी

रोजरोज भाजी काय बनवायची, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. आणि रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळादेखील येतो. आवडती भाजी नसली की चपाती आणि भातासोबत तोंडी लावायला म्हणून काही ना काही पदार्थ तयार केले जातात. त्यात बटाटा म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. पहायला गेलं तर बटाट्याचे असंख्य पदार्थ बनवले जातात. त्यातील एक म्हणजे बटाट्याचे क्रिस्पी काप. अगदी लगेच बनवून जेवण करु शकता. बटाट्याचे काप कसे बनवायचे ते पाहुयात…

साहित्य :

बटाटे – एक ते दोन
गरम मसाला –  एक चमचा 
लाल तिखट मसाला – एक चमचा 
हळद – अर्धा चमचा 
मीठ – चवीनुसार 
रवा – एक कप 
लिंबू रस – चवीवुसार
तांदळाचे पीठ – एक चमचा 
तेल –  तीन ते चार चमचा
कोथिंबीर – एक चमचा 

कृती :

सर्वप्रथम बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
नंतर त्या बटाट्याच्या गोल पातळसर चकत्या कापून घ्या
बटाट्याच्या गोल चकत्या एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात 10 ते 20 मिनिटे भिजत ठेवा
नंतर बाऊलमधील पाणी काढून घेऊन त्यात हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, चवीनुसार थोडासा लिंबूचा रस घालून बटाट्याचे काप मॅरीनेट करायला ठेवा
कोटिंग करुन घेण्यासाठी एका बाऊलमध्ये रवा, तांदळाचे पीठ, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ एकत्रित करुन त्यात हे बटाट्याचे काप घोळवून घ्या
त्यानंतर एका पसरट तव्यावर तेल सोडून त्यावर हे काप दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या
बटाट्याचे काप सर्व्ह करताना त्यावर आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
गरमागरम डाळ भातासोबत हे मसालेदार, चमचमीत काप खाण्यासाठी तयार आहेत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version