अजित रानडे यांना ७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाचा दिलासा

<br/>अजित रानडे यांना ७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
अजित रानडे यांना ७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाचा दिलासा

मुंबई : अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांना गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरुपदावरून हटविण्याचा आदेश ७ ऑक्टोबरपर्यंत अमलात आणू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी संस्थेला दिले. डॉ. रानडे कुलगुरुपदावर राहिले तरी संस्थेतील ज्येष्ठ प्राध्यापक दीपक शहा यांना सोपविण्यात आलेली दैनंदिन प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी शहाच पार पाडतील, असेही न्या. महेश सोनक व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्याने खंडपीठाने आधीचा दिलासा कायम ठेवत सुनावणी ४ ऑक्टोबरला ठेवली. कुलगुरुपदावरून हटवण्याच्या निर्णयाला डॉ. रानडे यांना आव्हान दिले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version