राज्यात शुक्रवारी तब्बल २०० कोरोना मृत्यूंची नोंद

राज्यात शुक्रवारी तब्बल २०० कोरोना मृत्यूंची नोंद

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मृतांचा आकडा अद्याप नियंत्रणात आलेला नाही. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार राज्यात २०० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०३ टक्के इतका झाला असून राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख २५ हजार ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात शुक्रवारी ८ हजार ९९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख ४० हजार ९६८ इतकी झाली आहे, तर शुक्रवारी १० हजार ४५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

तसेच मुंबईत शुक्रवारी ६०० नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर ५६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर ९६% इतका झाला आहे. मुंबईत सध्या ७७३१ सक्रिय रुग्ण आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version