काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन

काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन

पंजाब जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन झाले आहे. संतोख सिंह ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर संतोख सिंह यांना तत्काळ फगवाडा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. खासदार चौधरी संतोख सिंह हे राहुल गांधी यांच्याबरोबर ‘भारत जोडो यात्रे’त चालत होते. त्यावेळी चालत असताना संतोख सिंह यांची तब्येत खालावली. संतोख सिंह यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचं निधन झालं असल्याचं सांगितलं आहे.

आज यात्रेचा रात्रीचा मुक्काम कपूरथला येथील कोनिका रिसॉर्टजवळील मेहत गावात होता, मात्र आज सकाळी ९.३० च्या सुमारास काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाल्याने यात्रा थांबवण्यात आली आहे. मात्र, आज ही यात्रा थांबवली जाणार की राहुल गांधी पुन्हा यात्रेत सहभागी होणार याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

भारत जोडो यात्रा ३० जानेवारीला श्रीनगर, काश्मीरमध्ये संपणार आहे. काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून राहुल गांधी यात्रेची सांगता करणार आहेत. भारत जोडो यात्रेच्या समारोपाला काँग्रेसला विरोधी एकीची ताकद दाखवायची आहे, त्यासाठी २१ समविचारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. केसीआर ते अरविंद केजरीवाल, एचडी देवेगौडा आणि ओवेसी यांच्यापर्यंत जवळपास ८ राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version