प्रदिर्घ काळानंतर काँग्रेसचे चिंतन शिबीर होणार आहे. शुक्रवारपासून काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस हे शिबीर चालणार आहे. या तीन दिवसीय चिंतन शिबिरामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित असणार आहेत. विशेषत: महत्त्वाच्या सहा विषयावरती सखोल चर्चा होणार आहे. राजकीय, सामाजिक न्याय आणि विकास, अर्थव्यवस्था, संघटन, शेतकरी आणि कृषी, तरुण आणि रोजगार या सहा विषयावर चर्चा यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.
शुक्रवारपासून होणाऱ्या चिंतन शिबिरात प्रत्येक राज्याचा आढावा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि काँग्रेस या विषयावरसुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात महत्त्वाच्या सहा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यासाठी देशभरातील काँग्रेसचे नेत्यांची कमिटीही तयार करण्यात आलेली आहे. दरम्यान, चिंतन शिबिरासाठी महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री यशोमती ठाकूर तसेच आमदार प्रणिती शिंदे आणि इतर सचिव उपस्थित राहणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.