राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, वाईन विक्रीच्या या निर्णयामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, औरंगादमध्ये किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री होत आहे, ते ठिकाण स्वत: फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडी सरकारला आव्हान दिले आहे. औरंगाबादमधील सुपर मार्केट, मॉल, किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्यात आली, तर ती दुकाने फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे. पैशांसाठी राज्यातील संस्कृती जर बिघडत असेल तर शेतकऱ्यांना गांजा, चरस उत्पादन घेण्यासाठीसुद्धा परवानगी द्या, असा टोलाही जलील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे युवक व्यसनाधीन होऊन अनेक संसार मोडतील, त्यामुळे किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोध केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.