भारतरत्न लता दीदी यांचे प्रथम पुण्यस्मरण

भारतरत्न लता दीदी यांचे प्रथम पुण्यस्मरण

‘मेरी आवाजही पहेचान है’, असं म्हणत चाहत्यांच्या मनात आवाजाने अढळ स्थान निर्माण करणाऱ्या भारतरत्न लता दीदी यांचे आज प्रथम पुण्यस्मरण. लता दीदींची गाणी आवडत नसतील असा माणूस जगभरात मिळणं विरळाच. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या स्मरनार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

आपल्या आवाजाच्या जादूने प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत एका भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लतांजली कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेरक इव्हेंट यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम माटुंगा येथे पार पडणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

लतादीदींनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार पटकावला आणि इतिहासाच्या पानांमध्ये त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. १९७२ मधील ‘परिचय’ चित्रपट, १९७५ मधील ‘कोरा कागज’ आणि १९९० मधील ‘लेकिन’ चित्रपटांसह तीन चित्रपटांसाठी त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९७४ मध्ये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने लता मंगेशकर यांना इतिहासातील सर्वात रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून सूचीबद्ध केले आणि असे नमूद केले की त्यांनी १९४८ ते १९७४ दरम्यान “२० भारतीय भाषांमध्ये २५,००० पेक्षा कमी एकल, युगल आणि कोरस समर्थित गाणी” रेकॉर्ड केली आहेत. त्याच वेळी, त्यांना इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, जे २०१९ पर्यंत चालू राहिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version