भारतरत्न वाजपेयींच्या पुतळ्याच्या अनावरणाला परवानगी नाकारली

भारतरत्न वाजपेयींच्या पुतळ्याच्या अनावरणाला परवानगी नाकारली

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कांदिवली येथे वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार होता, परंतु राज्य सरकारने पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिली नाही, असा दावा भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज होणारा पूर्णाकृती पुतळा उभारणीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज मुंबईत येणार होते, परंतु काल राज्य सरकारने ऐनवेळी पुतळा उभारण्यासाठीची परवानगी नाकारली असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला, असा दावा भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिन साजरा केला जातोय. यानिमित्ताने शनिवारी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांमधल्या कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण यासारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version