राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या व्हायरल पत्राने माध्यमामध्ये चांगलीच खळबळ उडाली. या पत्रामध्ये राज्यपालांकडून ६ नावांची शिफारस करण्यात आली होती. राज्यपालांनी हे पत्र २९ ऑक्टोबर २०२० रोजी लिहिलं असल्याचे या पत्रात तरतूद आहे. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती रखडलेली असतानाच हे व्हायरल पत्र आल्याने एकच खळबळ उडाली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत सहा नावांची शिफारस केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता या पत्रावर राजभवन कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. शिफारशींचं हे पत्र बनावट असल्याचं राजभवननं स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी वीरभद्रेश करबसव्वा बसवंती, रमेश बाबुराव कोकाटे, सतीश रामचंद्र घरत, संतोष अशोक नाथ, मोरेश्वर महादू भोंडवे, जगन्नाथ शिवाजी पाटील या सहा नावांचा समावेश आहे. सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील वीस वर्षातील योगदान पाहता त्यांना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करत आहोत, असा या पत्रातील मजकूर आहे. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सही आणि राजमुद्रेचा शिक्काही असल्याचं सांगण्यात येत आहे. हे पत्र व्हायरल होऊन त्याची जोरदार चर्चा होत असतानाच राज भावनेने त्यावर खुलासा करत हे पत्र बनावट असल्याचं जाहीर केलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.