बँका शनिवारपासून चार दिवस बंद

बँका शनिवारपासून चार दिवस बंद

बँकेसंबंधित आपली महत्वाची कामे असतील तर ती आज आणि उद्या पूर्ण करून टाका, कारण शनिवारपासून पुढील चार दिवस बँका बंद राहणार आहेत. २६ मार्च ते २९ मार्चपर्यंत बँका बंद राहणार आहेत. २६ मार्चला चौथा शनिवार आणि २७ मार्चला रविवार असल्यामुळे बंद राहणार आहेत. तसेच बँक आणि विमा कर्मचाऱ्यांनी २८ आणि २९ मार्चला संपावर जाणार आहेत. त्यामुळे २६ मार्च ते २९ मार्चपर्यंत बँका बंद राहणार आहेत.

मार्च महिन्यात बँक कर्मचाऱ्यांचा संप होत असल्यामुळे सामान्य ग्राहकांसोबतच बॅंकिंग क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक सोडता इतर सर्व बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांचा हा संप नवीन कामगार कायद्याच्या विरोधात आहे. तसेच सरकार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करू पाहत आहे. सार्वजनिक आणि खासगी उद्योगांमदून कायमस्वरुपी रिक्त जागा न भरता सरसकट कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे यास विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये बँक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. राज्यातील जवळपास पाच लाखांहून अधिक बँक कर्माचारी, अधिकारी संपात सहभागी होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version