Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमस्खलन! 57 BRO कामगार अडकले, 10 जणांची सुटका

ही हिमस्खलनाची घटना चमोली येथील माना येथील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) कॅम्पजवळ घडली. आतापर्यंत 10 कामगारांना वाचवण्यात यश आले आहे.
Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमस्खलन! 57 BRO कामगार अडकले, 10 जणांची सुटका
Edited Image

Avalanche Hits Uttarakhand's Chamoli: उत्तराखंडमधील चमोली येथे झालेल्या मोठ्या हिमस्खलनात 57 कामगार अडकल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या भागात हिमस्खलन झाले त्या भागात रस्त्याचे बांधकाम सुरू होते. ही हिमस्खलनाची घटना चमोली येथील माना येथील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) कॅम्पजवळ घडली. आतापर्यंत 10 कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव पथके पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, घटनास्थळी बर्फवृष्टीमुळे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात अडचणी येत आहेत.

हेही वाचा – ब्रेक न घेता डबल ड्युटीवर असताना डुलकी लागणे, हा गुन्हा नाही! कर्नाटक उच्च न्यायालयचे निरीक्षण

पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद भरणे यांनी सांगितले की, मानाच्या सीमावर्ती भागात बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) कॅम्पजवळ मोठे हिमस्खलन झाला आहे. या हिमस्खलनात 57 कामगार अडकले होते. यापैकी 10 कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना माना जवळील आर्मी कॅम्पमध्ये पाठवण्यात आले आहे. 

खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळा – 

दरम्यान, बीआरओ (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन) चे कार्यकारी अभियंता सीआर मीना यांनी सांगितले की, घटनास्थळी 57 कामगार उपस्थित होते. सध्या घटनास्थळी तीन ते चार रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या आहेत, परंतु बर्फवृष्टीमुळे बचाव पथकाला तिथे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. खराब हवामानामुळे अद्याप बचावकार्य सुरू झालेले नाही. या भागात सतत बर्फवृष्टी होत आहे. यामुळे हेलिकॉप्टर तिथे जाऊ शकत नाही.

हेही वाचा –  दिल्ली उच्च न्यायालयाकडून Amazon ला झटका! 323 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे दिले आदेश

तथापी, ज्या भागात हिमनदी फुटली आहे तो नो नेटवर्क झोन आहे. तिथे सॅटेलाइट फोनही काम करत नाहीत. अपघाताचा बळी पडलेल्या टीमशी संपर्क साधणे शक्य नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आमचा प्रयत्न शक्य तितका सर्वांना वाचवण्याचा आहे. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version