अर्पिता मुखर्जीला अटक

अर्पिता मुखर्जीला अटक

अंमलजावनी संचालनालयाने पश्चिम बंगालचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीला शनिवारी एसएससीच्या अंतर्गत शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे. अर्पिताच्या घरातून उच्च शिक्षण विभागाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय एसएससीची अनेक कागदपत्रे तपासकर्त्यांनी जप्त केल्याची माहिती आहे. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरात २० कोटी रूपये अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडले आहेत.

राज्यातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरावर छापा टाकून २० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.  पश्चिम बंगालमध्ये कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ममता सरकारमधील अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या  कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेत. ज्या महिलेच्या घरातून २० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तिच्याबद्दल जाणून घेऊ. कोण आहे  अर्पिता मुखर्जी,  जिच्याकडून २० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची सहकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अर्पिता मुखर्जीने बंगाली अभिनेता प्रोसेनजीत आणि जीत यांच्यासोबत मुख्य भूमिकांसह काही सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्री भूमिका देखील पार पाडली आहे. अर्पिता पार्थ मुखर्जींसोबत अनेकवेळा राजकीय कार्यक्रमांमध्येही दिसली आहे. याशिवाय ती पार्थ चॅटर्जींसोबत प्रचार करतानाही दिसली होती.

दक्षिण कोलकाता येथील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीच्या समारंभात दोघे एकत्र दिसले होते. अर्पिता गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण कोलकाता येथे एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहे. ईडीने अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला, जेथे ईडीच्या पथकाने २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. “शोधादरम्यान, ईडीने पार्थ चॅटर्जींची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या राहत्या घरातून सुमारे २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली,” असं ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version