ज्ञानवापी मशीद प्रकरणी आणखी एक याचिका

ज्ञानवापी मशीद प्रकरणी आणखी एक याचिका

ज्ञानवापी मशीद प्रकरणी न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. विश्व वैदिक सनातन संस्थेने वाराणसी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली असून ज्ञानवापी परिसर हिंदूच्या ताब्यात देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याप्रकरणी आज दुपारी सुनावणी पार पडणार आहे.

काय आहेत मागण्या?

संपूर्ण ज्ञानवापी परिसर हिंदूच्या ताब्यात द्या.


ज्ञानवापी परिसरात विश्वेश्वराच्या पूजेची व्यवस्था करावी.


ज्ञानवापी परिसरात मुस्लिम नागरिकांच्या प्रवेशांवर बंदी घालावी.


ज्ञानवापीचा घुमट पाडण्याचे आदेश जारी करावे.


दरम्यान, ज्ञानवापी मशिदीप्रकरणी मंगळवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षबाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. त्यानुसार ज्ञानवापी मशिदीवर पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version