लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा

लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. तसेच या भरती अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना अग्नवीर असे नाव देण्यात येणार असून येत्या ऑगस्टपासून ही भरती होण्याची शक्यता आहे.

अग्निपथ या सैन्यभरतीसाठी कोणत्याही जाती, धर्म आणि प्रदेशातील तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतात. तर येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत या भरतीची शक्यता आहे. नव्या योजनेनुसार ही भरती चार वर्षांसाठी असणार आहे. चार वर्षानंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांची सेवा वाढवली जाईल तर काही सैनिकांना निवृत्त करण्यात येईल. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये सैनिकांना सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच या चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या सैनिकांना पेन्शन मिळणार नसून एकरकमी रक्कम दिली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version