दिवाळीत विमान प्रवास महागला!

दिवाळीत विमान प्रवास महागला!

देशातील कोरोना रुग्णसंख्या घटत असताना ठिकठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पर्यटकांना मिळालेल्या शिथिलतेमुळे प्रवाशांची संख्यादेखील तितकीच वाढत आहे. मात्र विमानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विमानाच्या तिकिटांत ३० ते ४५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढ असतानाच दुसरीकडे विमानाचे तिकीटदरही वाढल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचा विमान प्रवास महागला आहे.

दिवाळीनिमित्त अनेक प्रवाशांनी भटकंतीचे प्लॅन्स केले आहेत. मात्र भटकंतीसाठी विमानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आणि वेगाने होणारे लसीकरण यामुळे देशात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांना मिळालेल्या शिथिलतेमुळे प्रवाशांची संख्यादेखील वाढत चालली आहे.

विमानातील इंधनाच्या किंमतीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विमानाच्या इंधनाच्या किंमती दुप्पट झाल्या असल्या तरी विमान तिकिट दरातील वाढ तुलनेने कमी असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version