अभिनेता अरमान कोहलीच्या अडचणीत वाढ

अभिनेता अरमान कोहलीच्या अडचणीत वाढ

मुंबई, १३ जुलै २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहली हा नेहमीच कोणत्या न त्याच्या अभिनयामुूळे कमी तर वादांमुळे जास्त चर्चेत असतो. ड्रग्जपासून ते आपल्या प्रेयसी मारहाण करण्यापर्यंत अरमानवर अनेक खटले कोर्टात सुरू आहेत. आपल्या प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत. आता एकतर त्याला प्रेयसीला पैसे द्यावे लागणार आहेत किंवा तुरुंगात जावे लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण आहे 2018 सालचे. जेव्हा अरमान कोहलीची प्रेयसी नीरू रंधावाने त्याच्याविरुद्ध केली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत.अभिनेत्याने प्रेयसीला नीरूला ५० लाख रुपये देऊन तोडगा काढावा अन्यथा तुरुंगात शिक्षा भोगण्यास तयार राहावे.

सध्या या प्रकरणी अभिनेत्याची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, कोर्टाने अभिनेत्याच्या वकिलाला त्याचा पर्याय स्पष्ट करण्यासाठी १८ जुलैपर्यंत वेळ दिला आहे. नीरू रंधावाने २०१८ मध्ये अरमान कोहलीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अरमानला कलम ३२३, ५०४ आणि ५०६ कलम अंतर्गत अटक करण्यात आली होती.

तक्रारीत नीरूने सांगितले होते की, ती आणि अरमान तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघे मुंबईतील सांताक्रूझ फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. अभिनेत्याने तिला पायऱ्यांवरून खाली ढकलले आणि तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यावेळी कोर्टाने अरमान कोहलीला असे एफिडेवेट सादर करण्यास सांगितले होते, तो असे पुन्हा करणार नाही आणि नीरूला 50 लाख रुपये देईल. पण अभिनेत्याने तसे केले नाही. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version