भारतातील जवळपास १६ हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले

भारतातील जवळपास १६ हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले

रशिया-युक्रेनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठा संघर्ष सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक, विद्यार्थ्यांमुळे चिंता वाढली आहे. युक्रेनमध्ये भारतातील जवळपास १६ हजार नागरिक अडकले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

गुजरातमधील सुमारे २ हजार ५०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तर केरळमधील २ हजार ३२० विद्यार्थी अडकले आहेत. तमिळनाडूमधील ५ हजार विद्यार्थी, महाराष्ट्रातील १ हजार २०० विद्यार्थी, छत्तीसगडमधील ७० विद्यार्थी आणि १०० रहिवासी अडकले आहेत. मध्य प्रदेशमधील ८७ विद्यार्थी, राजस्थानमधील ६०० ते ८०० विद्यार्थी, हिमाचल प्रदेशातील १३० विद्यार्थी, हरियाणातील २ हजार आणि उत्तराखंडमधील ८५ रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा तीढा कायम असून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्राचे अथक प्रयत्न सुरू आहे. यासाठी भारत सरकारचे मिशन एअरलिफ्ट सुरू करण्यात येणार आहे. या मिशननुसार, एअर इंडियाचे दोन विशेष विमान तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारत सरकार एअरलिफ्ट मिशननुसार, एअर इंडियाचे दोन विमान युक्रेनमध्ये पाठवणार आहे. एक विमान मुंबईतून आणि एक विमान दिल्लीतून पाठवण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या मार्गाने भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात येणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. भारत सरकारच्या एअरलिफ्ट मिशननुसार युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी लवकरच मायदेशी परतणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version