कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले. त्यामध्ये अनेक डॉक्टरांचादेखील समावेश असून तब्ब्ल ५९४ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने ही आकडेवारी दिली असून या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये सर्वाधिक डॉक्टरांनी आपला प्राण गमावला आहे.
आयएमएने राज्यनिहाय आकडेवारी काढली असून यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी ४५ टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत.कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण १३०० डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याचं आयएमएने म्हटलं आहे.तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात १७ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.
दिल्लीमध्ये १०७, बिहारमध्ये ९६, उत्तर प्रदेशमध्ये ६७ आणि राजस्थानमध्ये ४३ डॉक्टरांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आयएमएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांत कोरोनाच्या दुसर्या लाटेत मरण पावलेल्या एकूण डॉक्टरांपैकी सुमारे ४० टक्के डॉक्टरांचा समावेश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.