मध्य रेल्वेवर दुपारपासून ३६ तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर दुपारपासून ३६ तासांचा मेगाब्लॉक

ठाणे-दिवा स्थानकादरम्यान आजपासून म्हणजेच शनिवार दुपार २ पासून ते सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर आज दुपारपासून ३६ तासांचा मेगाब्लॉक असल्यामुळे किमान ३९० लोक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेच्या या जम्बो  मेगाब्लॉकमुळे मात्र प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या स्थानकादरम्यान ३६ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-दिवा स्थानकाच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या नवीन रुळांना जोडणी देऊन क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक ८ जानेवारी (शनिवार) रोजी दुपारी २वा. ते १० जानेवारी (सोमवार) रोजी दुपार २वा.पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ३६ तासांच्या या जम्बो मेगाब्लॉकमध्ये किमान ३९० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर सोमवारी मेगाब्लॉक संपल्यावर लोकल रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version