मोहम्मद शमीच्या आईने दिल्या शुभेच्छा

मोहम्मद शमीच्या आईने दिल्या शुभेच्छा

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: विश्वचषक २०२३ अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी (१९ नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे होणार आहे. महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला मोहम्मद शमीकडून आणखी एका चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याआधी त्याची आई अंजुम आरा यांनी शामिल शुभेच्छा दिल्या आहेत.

विश्वचषक २०२३ मध्ये शमीची कामगिरी:

५/५४ – न्यूझीलंड वि
४/२२ – इंग्लंड वि
५/१८ – श्रीलंका वि
२/१८ – दक्षिण आफ्रिका वि
०/४१ – नेदरलँड वि
७/५७ – न्यूझीलंड वि

काय म्हणाली शमीची आई?

मोहम्मद शमीची आई अंजुम आरा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या मुलासारखा आहे आणि विश्वचषक जिंकून हे सर्वजण आनंदाने घरी यावेत, अशी ते देवाकडे प्रार्थना करतील. त्या म्हणाल्या, ‘देव मुलांना (भारतीय क्रिकेट संघ) विजयी करो आणि त्यांना आनंदाने घरी परत आणो…’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version