फडणवीसांमुळे ठाकरेंना दिलासा

फडणवीसांमुळे ठाकरेंना दिलासा

मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी लढत असलेल्या तेरा वर्षांच्या वेदांत ठाकरे याला उपचारांसाठी आवश्यक ती मदत मिळवून दिली. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे तातडीने उपचार करणे शक्य झाले. आता वेदांत ठाकरेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

वेदांतच्या आईवडिलांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. वेदांतच्या आजाराची माहिती मिळताच फडणवीस यांनी त्याला उपचारांसाठी आवश्यक ती मदत मिळवून दिली. वेदांत ठाकरे तब्येतीत सुधारणा होऊ लागल्यावर आईवडिलांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांना भेटून वेदांतला आनंद झाला. तर देवेंद्र फडणवीस यांनी वेदांत आणि त्याच्या आईवडिलांशी बातचीत केली. वेदांतच्या तब्येतीची विचारपूस केली आणि उपचार कशा प्रकारे सुरू आहेत ते जाणून घेतले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1773389620387950663

वेदांतशी बोलल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, लोकसेवा आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात असेच काही क्षण अधिक परिश्रम करण्यास ऊर्जा, प्रेरणा देऊन जातात; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी वेदांतला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version