एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक – पंतप्रधान

एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक – पंतप्रधान

नवी दिल्ली, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. सेमीकंडक्टर उत्पादनाशी संबंधित १.२५ लाख कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांची आज पायाभरणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविण्यात मदत होईल, असं मोदी म्हणाले. या प्रकल्पांमुळे ८० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. २१ वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात इलेक्ट्रॉनिक चिप्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतात तीन सेमीकंडक्टर प्लांट सुरू करण्यास मान्यता दिली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version