प्रियंका चोप्राची बहीण अडकली विवाह बंधनात

प्रियंका चोप्राची बहीण अडकली विवाह बंधनात

मुंबई, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : हिंदी तसेच परदेशातील हॉलिवूड चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा
ही नेहमीच चर्चेत असते. आता प्रियंकाच्या संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. तिची चुलत बहीण मीरा चोप्राचं शुभमंगल झालं आहे. उद्योगपती रक्षित केजरीवाल याच्यासोबत मीराने लग्नगाठ बांधली आहे. मीरा आणि रक्षित यांचा विवाह सोहळा गुजरातमध्ये पार पडला.

चोप्रा घराण्यातील प्रियांका आणि परिणीती चोप्रा यांच्या विवाह सोहळ्यानंतर मीरा चोप्राचं लग्न चर्चेत आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या . त्यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी आणि बऱ्याच कलाकारांनी तिला तिच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version