अनंत अंबानींचे भाषण ऐकून मुकेश अंबानी गहिवरले

अनंत अंबानींचे भाषण ऐकून मुकेश अंबानी गहिवरले

जामनगर, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : गुजरातमध्ये जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा तीन दिवसांचा विवाहपूर्व सोहळा सुरू आहे. या सोहळ्यातील अनंत अंबानी यांचे भाषण ऐकून त्यांचे वडील मुकेश अंबानी गहिवरले. अनंतचे भाषण ऐकून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या डोळ्यात अश्रू आले.

मी नशीबवान आहे… माझा आनंद व्यक्त करू शकतो… बालपणी मला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे… पण माझ्या पालकांनी मला कधीच वेगळे वाटू दिले नाही… ते सदैव माझ्या पाठीशी राहिले… मला धीर दिला… माझे जगणे आनंददायी करत राहिले… असे अनंत अंबानी म्हणाले. अनंत अंबानींचे हे भाषण ऐकून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या डोळ्यात अश्रू आले.

अनंत अंबानींच्या विवाहपूर्व सोहळ्यात मुकेश अंबानींचेही भाषण झाले. अनंतमध्ये वडील धीरुभाई अंबानी यांची झलक दिसते, असे मुकेश अंबानींनी सांगितले. अनंत हा धीरुभाईंसारखा लढवय्या आहे, त्याला राधिकाच्या रुपाने एक आदर्श जीवनसाथी मिळाल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची गाठ साक्षात देवानं बांधली आहे, असेही मुकेश अंबानी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version