निवृत्त न्या. खानविलकर झाले लोकपाल

निवृत्त न्या. खानविलकर झाले लोकपाल

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या लोकपाल पदावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांची नियुक्ती झाली. खानविलकर हे देशाचे दुसरे लोकपाल आहेत. निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र हे देशाचे पहिले लोकपाल होते. पिनाकी चंद्र मार्च २०१९ ते मे २०२२ या काळात लोकपाल पदावर होते. ते निवृत्त झाल्यानंतर लोकपाल पद रिक्त झाले होते. अखेर आता नव्या लोकपालाची नियुक्ती झाली आहे.

खानविलकर यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालय, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय, मुंबईचे उच्च न्यायालय येथे न्यायमूर्ती म्हणून काम केले होते. मुंबईच्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून काम केल्यानंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयात बदली झाली होती. सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर आता खानविलकर यांची लोकपाल पदावर नियुक्ती झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version