युवा खेळाडूंसह जिंकणे महत्त्वाचे – रोहित शर्मा

युवा खेळाडूंसह जिंकणे महत्त्वाचे – रोहित शर्मा

राजकोट, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी: भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ४३४ धावानी दणदणीत विजय मिळवला, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान अशा युवा खेळाडूंची कामगिरी या सामन्यात निर्णायक ठरली होती. कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत घायांच्या फरकाने सर्वांत मोठा विजय मिळविल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शमनि युवा खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.

“संघाच्या यशात अनुभवीपेक्षा युवा खेळाडूंची कामगिरी उजवी ठरली आहे. जुरेल, सर्फराज या दोन खेळाडूंनी पदार्पण केले होते. त्याचबरोबर संघात खूपच कमी कसोटी सामने खेळलेले खेळाडू देखील अधिक होते. यातील प्रत्येक जण मैदानावर येत असलेल्या अनुभवातून शिकत होता. जुरेल आणि सर्फराज यांनी आपली निवड सार्थ ठरवली,” असे रोहित म्हणाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version