ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा

ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गीतकार गुलजार या दोघांना २०२३ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. हे ज्ञानपीठ पुरस्काराचे ५८ वे वर्ष आहे. ज्ञानपीठ समितीने शनिवारी संध्याकाळी पुरस्कार जाहीर केले.

कोण आहेत जगद्गुरु रामभद्राचार्य ?

जगद्गुरुरामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्र. ते उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध. रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांमधील ते एक. ते १९८८ पासून चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठाचे संस्थापक अध्यक्ष. तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य दिव्यांग विद्यापीठाचे संस्थापक आणि आजीव कुलाधिपती आहेत. ते संस्कृत, हिंदीसह २२ भाषा बोलतात. त्यांनी अनेक भाषांमधून उत्तम रचना केली आहे. केंद्र सरकारने त्यांना २०१५ मध्ये पद्मविभूषणने गौरविले आहे.

कोण आहेत गुलझार ?

गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. ते कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते म्हणून प्रसिद्ध. गुलझार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानमध्ये आहे. गुलझार यांना धुआँ या कथा संग्रहासाठी २००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार, ‘जय हो’ या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील गीतासाठी ऑस्कर, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार यांनी गौरविण्यात आले आहे. तसेच गुलझार यांना आतापर्यंत पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version